Tuesday, June 5, 2012

भ्रमंती-आयर्लंड-3


माझं  प्रेझेन्टेशन झाल्यावर संध्याकाळी conference banquet dinner ला Guinness च्या brewery मध्ये जाण्याचा योग आला.  Guinness ही लोकप्रिय dry stout  (बीअर) इथे बनवली जाते. मदिरा हा काही माझ्या विशेष माहितीचा विषय नाही. त्यामुळे इथे जातांना आमच्यापैकी काहींना आलं होता तसं भरून वगरे मला काही आलं नव्हतं. पण एक कुतूहल मात्र नक्की होता. Guinness ची ही सगळ्यात मोठ्ठी आणि मुख्य brewary आहे. ७० एकर जागेवर पसरलेल्या या कारखान्यामध्ये एक इमारत पर्यटकांसाठी माहितीकेंद्रामध्ये convert केलेली आहे. या इमारती मध्ये Gunniess
 बनवण्याची प्रक्रिया audio-visual पद्धतीने समजावून सांगितली आहे.  या केंद्राला लागणारं पाणी आणि धान्य एवढं प्रचंड आहे की आपल्याकडे भारतात आंदोलनच झाली असती.Infact Dublin City Council चे लोक एकदा पाणीपुरवठा बंद करायला ही आलेले होते. तेव्हा Arthur Guinness हातात कुऱ्हाड घेऊन त्याच्या पाण्याच्या रक्षणासाठी उभा राहिला होता असं म्हणतात. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या ठिकाणी वापरला जाणारा यीस्ट हे एका तिजोरीत जपून ठेवलेलं होता. गेल्या कित्येक वर्षांपासून एका Batch मधलं थोडस यीस्ट पुढच्या Batch ला वापरतात.  आपल्याकडे आधीचा दही पुढच्या विरजणाला वापरतात अगदी तसं. असं केल्याने consistency maintain होते. असो. तर असं सगळं ते बघून झाल्यावर त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर डिनर चा बेत होता. तिथे actually एक पब होता. तिथून संपूर्ण डब्लिन शहर छानपैकी दिसत होतं. डिनर बरोबरच पब मध्ये आयरिश संगीताचा कार्यक्रम सुरु झाला. 

सोबतीला काही लोक Tap Dance करायला लागले. एकूणच मजा आली. या संगीताचा मूड सुरवातीला slow असतो पण नंतर हळूहळू तो एकदम fast होतो. या youtube video मध्ये तुम्हाला मी काय म्हणतो आहे त्याचा अंदाज येईल. 
या सगळ्या मधेच माझी आमच्या प्रोजेक्ट मधल्या दोन व्यक्तींशी ओळख झाली. Matrin आणि Max हे दोघे नेदरलंड मधल्या Rotterdam वरून आलेले होते. त्यांना Guinness try करण्यामध्ये विशेष interest होता. त्यांना Guinness फार काही आवडत नव्हती आणि नेदरलंड मधले त्यांचे Guinness प्रेमी मित्र त्यांना तिथे असं सांगायचे की  "wait till you try the original". पण आता ते दोघेही असं सांगू शकत होते की "we tried it at the original brewery and still didn't quite like it". या दोघांबरोबर दुसऱ्या दिवशी conference संपल्यावर फिरायला जायचा प्लान आखला आणि आम्ही सगळे हॉटेल वर परतलो. 
[क्रमशः]

Friday, May 25, 2012

भ्रमंती-आयर्लंड-2

गेले दोन दिवस माझ्या प्रेझेन्टेशन च्या तयारीत गेल्यामुळे नवीन पोस्त टाकता आली नाही त्या बद्दल क्षमस्व.


डब्लिन विमानतळ:
देशाच्या राजधानीचा इतका शांत विमानतळ मी आधी पाहिला नव्हता. कदाचित आमचा विमान कोपर्यात उतरवला असेल माहित नाही. पण प्रचंड शांतता होती तिथे. इमिग्रेशन चे नेहेमीचे सोपस्कार आटोपून मी arrivals लॉबी मध्ये tourist information center शोधायला लागलो. तेवढ्यात एक पंजाबी काकू येऊन मला म्हणाल्या कि त्यांच्या मुलाला त्यांना फोन करायचा आहे तर त्यांना माझा फोन वापरता येईल का? जरा साशंकतेनेच मी त्यांना फोन लावून दिला. तर तो पहिल्यांदा लागलाच नाही. मग तो answering machine वर गेला. हे एक अशक्य नाटक आहे, भारतात अजून फोन कंपन्यांना हा शोध लागलेला नाही. पैसे उकळण्याचा उत्तम धंदा. असो. मी त्यांचा मुलासाठी निरोप ठेवला आणि 
tourist information center च्या counter वर गेलो. तिथल्या ताईंनी  कुठली बस घ्यायची ते सांगितल आणि मी bus platforms कडे निघालो तेवढ्यात त्या काकूंच्या मुलाचा फोन आला. तो दुसऱ्या terminal वर होता. त्याला त्या काकू कुठे उभ्या आहेत ते नीट  सांगून मी निघालो. त्या काकूंच्या डोळ्यात पाणी होत आणि त्या गुरु दि कृपा  Thank you पुत्तर वगरे म्हणायला लागल्या. त्यांना ठरलेल्याच जागी थांबायला सांगून मी पुढे निघालो.  Bus platforms वर बस उभीच होती. हॉटेलचे नाव सांगून 10 युरो दिले आणि लक्ष्यात आला कि बसेस मध्ये सुट्टे मिळतच नाहीत. आता सुट्टे कुठून आणायचे असा विचार करतांना तो ड्रायव्हर म्हणाला कि stop वर ticket vending machine  आहे ते 10 युरो ची नोट घेऊन सुट्टे  परत देईल. ती बस निघून गेली पण दुसरी लगेचच होती. त्या बस च्या ड्रायव्हर ला लोकांनी stop  आला कि सांग म्हणून खूपच request केलेल्या होत्या बहुतेक. तो जरा वैतागलेला होता. इथले बस ड्रायव्हर आणि मी हा एका वेगळ्या पोस्ट  चा विषय आहे :) बसेस PMPML च्या वोल्वो बसेस सारख्या होत्या. भरपूर चालवून वाट लागलेल्या.

पण oxford  पेक्षा भरपूर स्वस्त त्यामुळे कुरकुर करायला जागा नव्हती. Oxford  मध्ये बस कंपन्या आमच्या बस मर्सिडिस च्या आहेत अशी जाहिरात करतात आणि तिकिटाच्या भावात खरच स्वतःची मर्सिडिस येईल असे रेट लावतात.
बस मधून उतरतांना एक चायनीज मुलगा भेटला. तो पण conference ला आलेला होता. माझ्याच हॉटेल ला राहणार होता. तो बिचारा आयरिश accent  मधली इंग्लिश ऐकून बावचळला होता. अखेर आम्ही दोघेही हॉटेल ला पोचलो.

हॉटेल:
हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन restaurant  मध्ये dinner  ला गेलो तर तिथे माझ्या गाईड च्या ओळखीचे एका अमेरिकन university प्रोफेसर होते. ते middle किंवा south eastern asian आहेत. त्यांना माझ्या गाईड ची ओळख सांगून गप्पा मारत होतो. ते त्यांच्या बायको ची वाट  बघत होते. त्यांनी waiter  ला Heineken ची order दिली. तो waiter आयरिश होता आणि त्याने एकदम चमकून त्यांच्याकडे पाहिले. त्याचा कारण होता कि डब्लिन मध्ये येऊन ते Guinness न घेता Heineken मागत होते. ही Guinness म्हणजे Guinness Book of  World Records वाली बिअर.  त्यांच्या बद्दल अजून माहिती पुढच्या पोस्त मध्ये.
[क्रमशः]


Tuesday, May 22, 2012

भ्रमंती-आयर्लंड-1

नमस्कार मित्रहो! बर्याच दिवसांनी जरा लिहिण्याचा मूड आला.
एका चर्चासत्रासाठी मी काही दिवस डब्लिन, आयर्लंड मध्ये आलेलो आहे.  इकडचे थोडे अनुभव शेअर करूया असा संकल्प आहे. बघू तडीस जातो का ते.

डब्लिन दिवस 1:

आज दुपारीच मी इंग्लंड मधून इकडे यायला निघालो. माझ्या पूर्वानुभवानुसार, लंडन Gatwick किंवा लंडन च्या कुठल्याही इतर विमानतळावरून उड्डाण करण्यापेक्षा, ऑक्सफोर्ड ते बर्मिंगहॅम रेल्वे ने जाऊन तिथून विमान पकडणे जास्ती सोप्पे आहे. एकतर बर्मिंगहॅमला रेल्वे एका तासात direct विमानतळावर जाते.  तेच लंडन च्या बाकीच्या विमानतळांवर जायलाच मुळी  2-3 तास लागतात आणि दुसरं म्हणजे बर्मिंगहॅमला जरा गर्दी पण कमी असते.  विमानतळाच्या रेल्वे स्टेशन वर, सबवे मध्ये चक्क साग पनीर sandwitch होता. त्यामुळे आधीच सबवे सापडल्याचा आनंद द्विगुणित झाला.

अचानकपणे या आठवड्यात सूर्यदेवांनी आन्ग्लादेशावर कृपादृष्टी दाखवायला सुरवात केली आहे. त्यामुळे दुपारी चक्क घामाच्या धारा वाहत होत्या. माझेच हे हाल तर इथल्या लोकांचा काय होत असेल देव जाणे. उकडत असतांना रायन एअ र  वाले या इकडून तिकडे फिरवत होते. एकतर त्यांची counters कुठेतरी लांब कोपर्यात असतात. (म्हणा त्यामुळेच ते स्वस्तात  तिकिट देऊ शकतात. पण  विमानतळावर लांबवर सामान वागवायचा जाम कंटाळा येतो.  त्यात counter वरच्या ताई सावकाश काम आंदोलनात सहभागी असल्या सारख्या काम करत होत्या.  इतर वेळी त्याचा काही वाटत नाही पण स्वतातल्या विमान कंपनीचा गेट ओपन होताना आपण रांगेत पुढे असावा लागता. कारण ती विमान स्वारगेट-भोर एसटी सारखी असतात. सीट नंबर नसतो.  त्यामुळे सोल्लिड मज्जा येते विमानमध्ये. लोक इकडे बसू का तिकडे बसू बघत  असतात. त्यांच्या मागे रांग लागते. Flight attendant बोंब मारत असतो बसून घ्या बसून घ्या म्हणून. एकदम एसटी  अनुभव.  

असो. तर, सामान चेक-इन करून गेट वर गेलो. इथे परत लांबवर चालावं  लागलं. गेट वर एक नवीनच मजा.
रायन एअर चा ग्राउंड स्टाफ  हातात एक पुठ्याचं खोकं घेऊन उभे होते. तुमची केबिन bag त्या खोक्यात बसली तरच ते तुम्हाला आत जाऊन देणार नाहीतर 50 पौंड टाका. आता त्या पोरी वेड्या सारख्या सामानाला खोकी फिट  करत बसल्या.
Bag थोडी मोठी असेल तर खोका थोडसं फाकवून बसवत होत्या. मला प्रयोजनच कळलं नाही याचं. जर खोका मोठा करूनच फिट करायचं असेल तर मुळात ते लावूनच कशाला बघा? बाकी या लो कॉस्ट विमान कंपन्या काम एकदम efficiently करतात. गेट ओपन झाल्यावर पुढे गेलो तर विमान गेट वर येत होत. पुढच्या 20 मिनिटात त्यातून लोक बाहेर आली. त्याची सफाई झाली. समान अनलोड आणि लोड झालं आणि आमच विमान उडालं.

[क्रमशः]

       
Wednesday, March 16, 2011

रुपेरी किनार

काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार..
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार

सार अंधारुनी आलं, वाट सापडेना कोठे,
चकवा लागला जीवा या, मन कासावीस झाले ...
बळ जमवुनी सारे करीन हे ही रान पार,
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार,
काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार ....

मन सागरात उसळे माझ्या विचारांचे वादळ,
आणि तयात अजुनी भाव भावनांचे कल्लोळ ...
परी करुनिया हिकमत गाठेनच पैलतीर,
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार,
काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार....

Monday, January 31, 2011

ओळखीच्या गीतांचे अनोळखी गीतकार

     बसल्या बसल्या सहज गाणी ऐकत होतो. शफल होत होत कोंबडी पळाली वाजायला सुरुवात झाली..
आता कोंबडी पळाली ऐकताना, तुम्हाला कोण कोण आठवतं? अजय अतुल, आनंद शिंदे, वैशाली सामंत,
भरत जाधव की क्रांती रेडकर? या गाण्याशी संबंधित एक व्यक्ती बराच काळ पडद्याआडच राहिली आणि
ती म्हणजे या गाण्याचा गीतकार. 'जितेंद्र जोशी'. आता जितू ने हे गाणं लिहिलं आहे हे बराच काळ लोकांना
माहितीच नव्हतं. आता ते हळू हळू कळायला लागलाय आणि जितेंद्र जोशी हे गीतकारही झाले..
       वेळ आणि इंटरनेट दोन्ही असलं की काय वाट्टेल तो टाईमपास करता येतो. "आठवणीतली गाणी"
हाताशी होतंच. म्हटलं चला जरा शोधूया अशी गाणी. त्यातून जे सापडलं ते तुमच्या समोर मांडतोय..

१) राधा ही बावरी:
          आता स्वप्नील बांदोडकरने गायलेलं हे गीत सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्या "तू माझा किनारा" या
     अल्बम मधलं. पण अशोकजी पत्कींनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत हे आहे का तुम्हाला ठावूक?
     या गाण्याचे बोल आणि संगीत दोन्ही अशोकजींचच आहे. वाचायचेत बोल? मग मारा टिचकी ..!

२) हिल हिल पोरी हिला:
                  ओल्ड हिट गाणं, परत "सातच्या आत घरात" मध्ये रिमिक्स झालं. राखीताई सावंतांच्या
            (त्याच हो इन्साफ वाल्या) आणि मकरंद अनासपुरे नाचले होते त्याच्यावर.  (काय सॉलिड कोम्बीनेशन
            आहे राखी सावंत - मकरंद अनासपुरे)
                   असो.. तर मूळ गाणं आहे "आंधळा मारतो डोळा" चित्रपटातलं. जयवंत कुलकर्णी आणि
           उषाताई मंगेशकरांनी गायलेलं, गाणारा व्हायोलीन वाल्या प्रभाकर जोगांनी संगीतबद्ध केलेलं
           आणि चक्क दादा कोंडकेंनी लिहिलेलं. दादांनी अजूनही काही हिट गाणी लिहिली आहेत बरका..!
           पहायचीयेत? मायला मग मारा की टिचकी ..!

३) यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या:
                 तुमच्या घरी आजोबा आहेत का? त्यांना जाऊन विचारा हे गाणं आठवतंय का ते! आज्जीला 
           अजिबात विचारू नका, मार खाल बेदम ..! १९३८ साली ब्रह्मचारी नावाच्या सिनेमात मीनाक्षी 
           शिरोडकरांवर हे गाणं चित्रित झालं. आता तुम्ही म्हणाल इसमे इतना इस्पेशल क्या है? तर गम्मत 
           अशी आहे की या गाण्यात मीनाक्षी बाईंनी चक्क स्विमसूट घातला आहे.! १९३७ साली गजब झाला
           होता या गाण्यामुळे. 
                   या मीनाक्षीबाई म्हणजे शिल्पा आणि नम्रता शिरोडकर भगिनींच्या आज्जी. सुदेश भोसले 
            पण त्यांचेच नातू. (हे जरा चेक करायचंय पण बहुतेक मी बरोबर आहे.) तेलुगु लोकांसाठी अजून एक
           ओळख म्हणजे , या आजीबाई म्हणजे महेशबाबूच्या आजेसासूबाई. नम्रता शिरोडकर यांनी महेशबाबुंशी
            लग्न केलाय ना..!  तर पैचान कोन बस झालं, आता गीतकार कोन ते सांगतो. हे गाणं प्रत्यक्ष 
            अत्रे साहेबांनी लिहिलेलं आहे. हे पिक्चर पण त्यांनीच प्रोड्यूस केलं होतं.अत्रेसाहेबांनी 
            "श्यामची आई" मधलं गाजलेलं "द्रौपदीसी बंधू शोभे" हे गाणं पण लिहिलं आहे.
            खरंच, अत्रेसाहेबांसारखा माणूस दहाहज्जार वर्षात होणे नाही..!

काय म्हणता? तुम्हाला अजून अशी गाणी माहिती आहेत?
अहो मग लिवा की राव कामेंट.!
आणि आवडली असेल पोस्ट तर तसं पण लिवा.!

आपलाच,
ओंकार

Sunday, January 30, 2011

निमंत्रण

थोडसं मनातलं, थोडसं हृदयातलं ..
थोडी शिकवण आणि थोडीशी आठवण, 
थोडा दंगा अन थोडी मस्ती..
थोडं जरुरी अन बाकी उठाठेव नसती

थोडेसे तुम्ही, भरपूर आम्ही..
टाईमपास गप्पा, आठवणीतली गाणी..
अवतीभोवती, देश आणि राजकारण,
नवीन ब्लॉग वर येण्याचं हे आग्रहाचं निमंत्रण..!