Tuesday, May 22, 2012

भ्रमंती-आयर्लंड-1

नमस्कार मित्रहो! बर्याच दिवसांनी जरा लिहिण्याचा मूड आला.
एका चर्चासत्रासाठी मी काही दिवस डब्लिन, आयर्लंड मध्ये आलेलो आहे.  इकडचे थोडे अनुभव शेअर करूया असा संकल्प आहे. बघू तडीस जातो का ते.

डब्लिन दिवस 1:

आज दुपारीच मी इंग्लंड मधून इकडे यायला निघालो. माझ्या पूर्वानुभवानुसार, लंडन Gatwick किंवा लंडन च्या कुठल्याही इतर विमानतळावरून उड्डाण करण्यापेक्षा, ऑक्सफोर्ड ते बर्मिंगहॅम रेल्वे ने जाऊन तिथून विमान पकडणे जास्ती सोप्पे आहे. एकतर बर्मिंगहॅमला रेल्वे एका तासात direct विमानतळावर जाते.  तेच लंडन च्या बाकीच्या विमानतळांवर जायलाच मुळी  2-3 तास लागतात आणि दुसरं म्हणजे बर्मिंगहॅमला जरा गर्दी पण कमी असते.  विमानतळाच्या रेल्वे स्टेशन वर, सबवे मध्ये चक्क साग पनीर sandwitch होता. त्यामुळे आधीच सबवे सापडल्याचा आनंद द्विगुणित झाला.

अचानकपणे या आठवड्यात सूर्यदेवांनी आन्ग्लादेशावर कृपादृष्टी दाखवायला सुरवात केली आहे. त्यामुळे दुपारी चक्क घामाच्या धारा वाहत होत्या. माझेच हे हाल तर इथल्या लोकांचा काय होत असेल देव जाणे. उकडत असतांना रायन एअ र  वाले या इकडून तिकडे फिरवत होते. एकतर त्यांची counters कुठेतरी लांब कोपर्यात असतात. (म्हणा त्यामुळेच ते स्वस्तात  तिकिट देऊ शकतात. पण  विमानतळावर लांबवर सामान वागवायचा जाम कंटाळा येतो.  त्यात counter वरच्या ताई सावकाश काम आंदोलनात सहभागी असल्या सारख्या काम करत होत्या.  इतर वेळी त्याचा काही वाटत नाही पण स्वतातल्या विमान कंपनीचा गेट ओपन होताना आपण रांगेत पुढे असावा लागता. कारण ती विमान स्वारगेट-भोर एसटी सारखी असतात. सीट नंबर नसतो.  त्यामुळे सोल्लिड मज्जा येते विमानमध्ये. लोक इकडे बसू का तिकडे बसू बघत  असतात. त्यांच्या मागे रांग लागते. Flight attendant बोंब मारत असतो बसून घ्या बसून घ्या म्हणून. एकदम एसटी  अनुभव.  

असो. तर, सामान चेक-इन करून गेट वर गेलो. इथे परत लांबवर चालावं  लागलं. गेट वर एक नवीनच मजा.
रायन एअर चा ग्राउंड स्टाफ  हातात एक पुठ्याचं खोकं घेऊन उभे होते. तुमची केबिन bag त्या खोक्यात बसली तरच ते तुम्हाला आत जाऊन देणार नाहीतर 50 पौंड टाका. आता त्या पोरी वेड्या सारख्या सामानाला खोकी फिट  करत बसल्या.
Bag थोडी मोठी असेल तर खोका थोडसं फाकवून बसवत होत्या. मला प्रयोजनच कळलं नाही याचं. जर खोका मोठा करूनच फिट करायचं असेल तर मुळात ते लावूनच कशाला बघा? बाकी या लो कॉस्ट विमान कंपन्या काम एकदम efficiently करतात. गेट ओपन झाल्यावर पुढे गेलो तर विमान गेट वर येत होत. पुढच्या 20 मिनिटात त्यातून लोक बाहेर आली. त्याची सफाई झाली. समान अनलोड आणि लोड झालं आणि आमच विमान उडालं.

[क्रमशः]

       




No comments:

Post a Comment