Wednesday, March 16, 2011

रुपेरी किनार

काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार..
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार

सार अंधारुनी आलं, वाट सापडेना कोठे,
चकवा लागला जीवा या, मन कासावीस झाले ...
बळ जमवुनी सारे करीन हे ही रान पार,
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार,
काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार ....

मन सागरात उसळे माझ्या विचारांचे वादळ,
आणि तयात अजुनी भाव भावनांचे कल्लोळ ...
परी करुनिया हिकमत गाठेनच पैलतीर,
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार,
काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार....