Wednesday, March 16, 2011

रुपेरी किनार

काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार..
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार

सार अंधारुनी आलं, वाट सापडेना कोठे,
चकवा लागला जीवा या, मन कासावीस झाले ...
बळ जमवुनी सारे करीन हे ही रान पार,
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार,
काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार ....

मन सागरात उसळे माझ्या विचारांचे वादळ,
आणि तयात अजुनी भाव भावनांचे कल्लोळ ...
परी करुनिया हिकमत गाठेनच पैलतीर,
भांबावल्या मनाला एका आशेचा आधार,
काळ्या ढगालाही असते एक रुपेरी किनार....

3 comments:

  1. अंधार सारुनि हा, दिशा पुन्हा उजळेल
    दिन-रात्रीचा हा खेळ, आहे इथे भरुन
    जो हार मानत नाही, त्याला दिसे पहाट
    अखंड चालत राही, त्यासी मिळेल वाट

    ReplyDelete