Friday, May 25, 2012

भ्रमंती-आयर्लंड-2

गेले दोन दिवस माझ्या प्रेझेन्टेशन च्या तयारीत गेल्यामुळे नवीन पोस्त टाकता आली नाही त्या बद्दल क्षमस्व.


डब्लिन विमानतळ:
देशाच्या राजधानीचा इतका शांत विमानतळ मी आधी पाहिला नव्हता. कदाचित आमचा विमान कोपर्यात उतरवला असेल माहित नाही. पण प्रचंड शांतता होती तिथे. इमिग्रेशन चे नेहेमीचे सोपस्कार आटोपून मी arrivals लॉबी मध्ये tourist information center शोधायला लागलो. तेवढ्यात एक पंजाबी काकू येऊन मला म्हणाल्या कि त्यांच्या मुलाला त्यांना फोन करायचा आहे तर त्यांना माझा फोन वापरता येईल का? जरा साशंकतेनेच मी त्यांना फोन लावून दिला. तर तो पहिल्यांदा लागलाच नाही. मग तो answering machine वर गेला. हे एक अशक्य नाटक आहे, भारतात अजून फोन कंपन्यांना हा शोध लागलेला नाही. पैसे उकळण्याचा उत्तम धंदा. असो. मी त्यांचा मुलासाठी निरोप ठेवला आणि 
tourist information center च्या counter वर गेलो. तिथल्या ताईंनी  कुठली बस घ्यायची ते सांगितल आणि मी bus platforms कडे निघालो तेवढ्यात त्या काकूंच्या मुलाचा फोन आला. तो दुसऱ्या terminal वर होता. त्याला त्या काकू कुठे उभ्या आहेत ते नीट  सांगून मी निघालो. त्या काकूंच्या डोळ्यात पाणी होत आणि त्या गुरु दि कृपा  Thank you पुत्तर वगरे म्हणायला लागल्या. त्यांना ठरलेल्याच जागी थांबायला सांगून मी पुढे निघालो.  Bus platforms वर बस उभीच होती. हॉटेलचे नाव सांगून 10 युरो दिले आणि लक्ष्यात आला कि बसेस मध्ये सुट्टे मिळतच नाहीत. आता सुट्टे कुठून आणायचे असा विचार करतांना तो ड्रायव्हर म्हणाला कि stop वर ticket vending machine  आहे ते 10 युरो ची नोट घेऊन सुट्टे  परत देईल. ती बस निघून गेली पण दुसरी लगेचच होती. त्या बस च्या ड्रायव्हर ला लोकांनी stop  आला कि सांग म्हणून खूपच request केलेल्या होत्या बहुतेक. तो जरा वैतागलेला होता. इथले बस ड्रायव्हर आणि मी हा एका वेगळ्या पोस्ट  चा विषय आहे :) बसेस PMPML च्या वोल्वो बसेस सारख्या होत्या. भरपूर चालवून वाट लागलेल्या.

पण oxford  पेक्षा भरपूर स्वस्त त्यामुळे कुरकुर करायला जागा नव्हती. Oxford  मध्ये बस कंपन्या आमच्या बस मर्सिडिस च्या आहेत अशी जाहिरात करतात आणि तिकिटाच्या भावात खरच स्वतःची मर्सिडिस येईल असे रेट लावतात.
बस मधून उतरतांना एक चायनीज मुलगा भेटला. तो पण conference ला आलेला होता. माझ्याच हॉटेल ला राहणार होता. तो बिचारा आयरिश accent  मधली इंग्लिश ऐकून बावचळला होता. अखेर आम्ही दोघेही हॉटेल ला पोचलो.

हॉटेल:
हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन restaurant  मध्ये dinner  ला गेलो तर तिथे माझ्या गाईड च्या ओळखीचे एका अमेरिकन university प्रोफेसर होते. ते middle किंवा south eastern asian आहेत. त्यांना माझ्या गाईड ची ओळख सांगून गप्पा मारत होतो. ते त्यांच्या बायको ची वाट  बघत होते. त्यांनी waiter  ला Heineken ची order दिली. तो waiter आयरिश होता आणि त्याने एकदम चमकून त्यांच्याकडे पाहिले. त्याचा कारण होता कि डब्लिन मध्ये येऊन ते Guinness न घेता Heineken मागत होते. ही Guinness म्हणजे Guinness Book of  World Records वाली बिअर.  त्यांच्या बद्दल अजून माहिती पुढच्या पोस्त मध्ये.
[क्रमशः]


2 comments: